Posts

Today's thoughts are tomorrow's things

अमेरिकी मॉडेल झाली ‘न्यू थॉट’ महागुरू :ल्युईस हे. आपल्याकडे   स्वामी, बाबा, ‘गुरु’ ‘महागुरू’ अशी नावे धारण करणा-या व्यक्ती प्रसिद्धीच्या झोतात येतात त्या त्यांची भयंकर अनैतिकता किंवा भ्रष्टाचार उघड झाल्यावर ! या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ‘फॅशन मॉडेल’ म्हणून एकेकाळी गाजलेल्या आणि आज न्यू थॉट विचारसरणीतील जेष्ठ गुरु मानल्या जाणा-या श्रीमती ल्युईस हे यांची कथा मोठी रोचक आहे. न्यू थॉट चळवळीने जगभर जसे अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यातील बदलाचे विक्रम घडविले तसेच एका नव्या जीवनशैलीने समाजाची मानसिकता कशी बदलली जाऊ शकते ते सिद्ध करणारी प्रात्यक्षिकेही दिली. श्रीमती ल्युईस हे यांचा जन्म लॉस एंजेलिस येथे एका अत्यंत गरीब घरात १९२६ साली झाला . पती सोडून गेल्याने त्यांच्या आईने एकट्यानेच त्यांचे संगोपन केले. संसारात जोडीदार हवा म्हणून आईने केलेले दुसरे लग्नही फसले .   त्यांच्या नव्या वडिलांनी तर आई आणि मुलगी अशा दोघांवर अत्याचार केले .   केवळ ५ व्या वर्षी खुद्द ल्युईस यांच्यावर शेजा - यानेच लैंगिक अत्याचार के ला. असे खिन्न बालपण मिळालेल्या ल्युईस यांनी वयाच्या १५ व्य